वेकोली वणी क्षेत्राच्या बेलोरा-नायगाव कोळसा खाणीत महानिर्वाण दिनी कामगारांतर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी वेकोलीचे अधिकारी राजेशकुमार राय यांच्यासह अन्य अधिकारी व कामगार नेते उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या जिवनचरीत्रावर आपल्या भाषणातूध प्रकाश टाकला.याशिवाय निलजई ऊपक्षेत्रिय कार्यालयात प्रबंधक जुल्फिकार अंसारी यांच्या उपस्थितीत बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.