शाहूवाडी: माजी आमदार सत्यजित पाटील यांची शेंबवणे येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाला भेट, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी.
शेंबवणे पैकी गुरववाडी येथे लघुपाटबंधारे तलावाचे काम सुरु असताना अतीवृष्टीमुळे तलावाचा भराव वाहून गेला. तलावातील पाणी व गाळ शेतकऱ्यांच्या शेतात गेल्याने सुमारे ३० ते ३५ एकरातील भातशेती व ऊसाचे मोठे नुकसान .माजी आमदार सत्यजित पाटील यांनी आज शुक्रवार १८ जुलै दुपारी तीन वाजता या भागाला भेट दिली व नुकसान भरपाईची मागणी केली.