२९३ अन्वये प्रस्तावावर बोलताना आमदार हिकमत उढाण यांनी अतिवृष्टी व जायकवाडी धरणातून झालेल्या अवाजवी विसर्गामुळे घनसावंगी मतदारसंघातील ४० गावांवर आलेल्या पुरस्थितीचा प्रश्न जोरदारपणे मांडला. त्यामुळे झालेल्या शेती, घरांचे, पायाभूत सुविधांचे नुकसानीबाबत तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या त्यांनी सभागृहात केल्या.