पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील एका 58 वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली ही धक्कादाय घटना सोमवार दिनांक 12 सायंकाळी उघडकीस आली दरम्यान कचरू भगवान शिंदे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे विहामांडवा शिवारात गट क्रमांक 467 मध्ये कचरू शिंदे यांची साडेचार एकर शेती आहे गेल्या काही काळापासून अतिवृष्टी आणि सततच्या नापिकेमुळे त्यांचे मोठे नुकसान झाले होते शेतीवर घेतलेले कर्ज कसे फेडायचे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा