कन्नड: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत जातपात नको, विकासाला मत द्या! — तातेराव भुजंग यांचे मतदारांना आवाहन व्हायरल
कन्नड तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये जातपात, धर्म किंवा गटतट न पाहता केवळ विकासाच्या मुद्द्यावर मतदान करावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तातेराव भुजंग यांनी आज दि १९ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता मतदारांना केले आहे. स्थानिक विकास, शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. निवडणुकीत विभाजनकारी राजकारण टाळून एकत्रितपणे प्रगतीकडे वाटचाल करावी, असे त्यांनी सांगितले.