चाळीसगाव: जळगाव जिल्ह्याचे मा. पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत, चाळीसगाव शहर वाहतूक शाखेने छत्रपती शिवाजी महाराज चौकात नाकाबंदी लावली असताना, दोन संशयास्पद मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या दोन्ही दुचाकी चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.