खुलताबाद नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे राज्यसभा खासदार व प्रसिद्ध शायर इम्रान प्रतापगढी यांची आज दि ३० नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास खुलताबादेत जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली.इम्रान प्रतापगढी यांनी आपल्या प्रभावी शायरीतून महायुतीवर जोरदार टीका करत जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काँग्रेसचे आश्वासन मांडले.