समुद्रपूर: गिरड येथील विकास विद्यालयातील ठाणेदार संदिप गाडे यांनी विद्यार्थ्यांना केले नविन कायदे विषयक मार्गदर्शन
१ जुलै पासून अंमलात आलेल्या नविन कायद्या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बुधवारी १२ वाजता गिरड येथील विकास विद्यालयात मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला मुख्याध्यापक शरद तडस तर मार्गदर्शन म्हणून ठाणेदार संदिप गाडे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना ठाणेदार संदिप गाडे यांनी जुने कायदे व १ जुलै पासून अंमलात आणलेल्या नवीन कायद्या बदल सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत