आज दि 8 फेब्रुवारी दुपारी 3 वाजता उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पोलीस प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. जिल्हाभरात मतदान ज्या पद्धतीने शांततेत व सुरळीत पार पडले, त्याच पद्धतीने मतमोजणी प्रक्रिया देखील निर्विघ्न पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतमोजणी केंद्र परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.