शेगाव येथील इंदिरा गांधी शाळे जवळ असलेल्या एका घराच्या अंगणातून लॅपटॉप व मोबाईल लंपास झाल्याची घटना २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजे दरम्यान उघडकीस आली आहे. शेगाव येथील इंदिरा गांधी शाळे जवळील रहिवासी विजय श्रीरामसा ददगाळ (५८) यांची मुलगी अंगणात लॅपटॉपवर काम करीत होती. कामानिमित्त घरात जावून परत अंगणात आली असता तिला लॅपटॉप (किं. २७ हजार) व दोन मोबाईल (किं.२० हजार) दिसून आले नाही.