चाळीसगाव: महामार्गावर अपघात; नानिज्धाम रुग्णवाहिकेमुळे जखमींना तात्काळ मदत
चाळीसगाव (जळगाव): धुळे-चाळीसगाव-संभाजीनगर महामार्गावर मंगळवार, दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजून २ मिनिटांनी झालेल्या एका अपघातात एक व्यक्ती जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच, जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नानिज्धाम (खडकी बायपास) यांची २४ तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि जखमींना मदत केली.