बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस-वंचितची आघाडी,पत्रकार भवनात संयुक्त पत्रकार परिषदेत केली घोषणा
बुलढाणा जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची आघाडी झाल्याची घोषणा आज 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख एड.प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोबत लढण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.त्यानंतर काँग्रेस आणि वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली.ही आघाडी फक्त काँग्रेस आणि वंचितची असणार असेही स्पष्ट करण्यात आले.