आज गुरुवार 4 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता जवाहर नगर पोलिसांनी माहिती दिली की, जवाहर नगर पोलीस ठाणे हद्दीतून नागरिकांचे चोरीला गेलेले आणि हरवलेले पंचवीस मोबाईल तपास करून जप्त करण्यात आले असून सदरील मोबाईल आज रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन कल्याणकर यांच्या हस्ते नागरिकांना परत करण्यात आले आहे यावेळी नागरिकांनी जवाहर नगर पोलिसांचे व पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहे अशी माहिती आज रोजी जवाहरनगर पोलिसांनी सदरील माहिती दिली आहे.