धरणगाव: मेहरूण परिसरात दारू पिऊन महिलेचा धिंगाणा; गैरवर्तन केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल
जळगाव शहरातील मेहरूण भागातील अदित्य चौकात २८ वर्षीय महिला दारू पिऊन रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या नागरीकांना त्रास होईल असे मोठमोठ्याने आरडा ओरड करून गैरवर्तन केल्याचा प्रकार रविवारी ७ डिसेंबर रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास समोर आला आहे. याप्रकरणी पोलीसांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी ८ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.