तेल्हारा: माळेगाव बाजार महसुल मंडळातील दानापूर येथे गव्हाच्या पिकांवर मर रोगांचा व किडीचा प्रादुर्भाव.
शेतकरी चिंतेत.
Telhara, Akola | Mar 29, 2024 माळेगाव बाजार महसुल मंडळातील दानापूर येथे गहू पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने गहू उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.बागायती क्षेत्र मोठे असल्याने या महसूल मंडळात बागायती पिके मोठया प्रमाणावर घेतली जातात . वाण धरणातून पाटसरी च्या माध्यमातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर यावर्षी गव्हाची लागवड ही मोठ्या प्रमाणावर झाली आहे.मात्र यावर्षी गहू पिकांवर मररोग वकिड रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने गव्हाचे नुकसान झाले आहे