बुलढाणा: बुलडाणा न.प. निवडणूकीसाठी चौथ्या दिवशी नगरसेवक पदासाठी 1 उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज दाखल
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 10 नोव्हेंबर पासून नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.2 दिवस एकाही इच्छुक उमेदवाराने नामांकन अर्ज दाखल केला नाही. तिसऱ्या दिवशी नगरसेवक पदासाठी पहिला नामांकन अर्ज दाखल झालं आहे.तर आज 13 नोव्हेंबर रोजी प्रभाग क्र 15 अ साठी शिवसेना पक्षाकडून पुष्पा शिवाजी धुड यांचा नामनिर्देशन अर्ज दाखल झाला.बुलढाण्यात आजपर्यंत नगरसेवक पदासाठी 2 अर्ज प्राप्त झाले असून नगराध्यक्ष पदासाठी एकही अर्ज नसल्याची माहिती झालेला नाही.