खासगी शैक्षणिक संस्थांचे हित जपण्यासाठी पदवीधर आमदारांनी माझ्या विरोधात भूमिका घेतली, असा आरोप आमदार बंब यांनी आज दि चार फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता बाजार सावंगी केला.सामान्य विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी घेतलेल्या निर्णयांमुळे काहींचे हितसंबंध धोक्यात आले, असे ते म्हणाले.यामुळेच काही राजकीय शक्ती एकत्र येऊन माझ्या विरोधात उभ्या राहिल्या, असा दावा त्यांनी केला.