आज दि. 8 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता खुजडा येथील गोदावरी नदी पात्रात अवैध रेती उपसा करणाऱ्या विरुद्ध मुदखेड पोलीस व महसूल पथकाने छापामार कार्यवाही करत दोन हॉपर फायबर, एक इंजिन असलेली बोट व 1 इंजन असा मिळून 42 लाखांचा मुद्देमाल अवजड असल्याने त्यांचा पंचनामा करून त्यास जिलेटिन द्वारे जाळून नष्ट केले आहेत, अशी माहिती एका प्रेसनोटद्वारे संध्याकाळी 5 च्या सुमारास देण्यात आली आहे.