भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, आज पुन्हा एका भीषण अपघातात तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. लाखनी येथून भंडाराच्या दिशेने जात असताना, धारगाव जवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला दुचाकीस्वाराने पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये दुचाकीस्वार संकेत सपाटे (रा. लाखनी) याचा जागीच मृत्यू झाला.