आज बुधवार तीन डिसेंबर रोजी हरसुल पोलिसांनी माहिती दिली की, दोन डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता फिर्यादी सय्यद शाहरुख सय्यद जाहेद वय 38 वर्ष राहणार जहागीर कॉलनी छत्रपती संभाजीनगर यांनी हर्सूल पोलिसांनी तक्रार दिली की, दोन डिसेंबरला दुपारी चार वाजता आरोपी अमित आदमाने वय वीस वर्षे राहणार जहांगीर कॉलनी याने फिर्यादीला ऑपरेशन ब्लेडने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक पागोटे ही पुढील तपास करीत आहे.