नागपूर-अमरावती हायवेवर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने एका दुचाकीला मागून जोरात धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात हॉटेल व्यावसायिक गंभीर जखमी झाले असून, वाडी पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी प्रदीप धर्मपाल मन्नी यांचे अमरावती रोडवर 'द स्टार लाईट' नावाचे रेस्टॉरंट आहे. १८ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ६:३० वाजेच्या सुमारास मन्नी हे त्यांच्या ॲक्टिवा मोपेडने जात होते.