केंदूर (ता. शिरूर) येथे पहाटेच्या सुमारास तीन चोरट्यांनी घरात घुसून कोयत्याचा धाक दाखवत एका कुटुंबाला मारहाण केली आणि सोन्याचे साडेचार तोळे दागिने व रोख रक्कम लुटून नेल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी शिक्रापूर पोलिसात तीन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.