चाळीसगाव: प्रतिनिधी - घाट रोड शहरातील घाट रोड, हुडको कॉलनी परिसरात गुरुवार, दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ७.४० वाजताच्या सुमारास साहिल कादर यांच्या आमलेट पावच्या गाडीला अचानक आग लागल्याची घटना घडली. एस.आय. श्री. विजय जाधव सर यांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर, अग्निशमन अधिकारी श्री. अक्षय घुगे यांच्या कुशल नेतृत्वाखाली ही आग यशस्वीरित्या विझवण्यात आली.