समुद्रपूर: स्वास्थ वृक्ष फाउंडेशनच्या वतीने संस्कार ज्ञानपीठ वि. खा.अमर काळे यांच्या पुढाकाराने पडले पडले गर्भाशय,मुख कॅन्सर शिबिर
समुद्रपुर शहरातील संस्कार ज्ञानपीठ विद्यालयात स्वास्थ वृक्ष फाउंडेशन द्वारा आयोजित खासदार अमर काळे यांच्या पुढाकाराने गर्भाशयाच्या मुख कॅन्सर वरील प्रतिबंधनात्मक मोफत लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण शिबीराचे उद्घाटन शरद पवार पक्षाचे राष्ट्रवादिचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समुद्रपूर तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील,काँग्रेस नेते डॉ.रामकृष्ण खुजे, अशोकजी वांदिले,शहराध्यक्ष मधुकर कामडी आदी उपस्थित होते.