बार्शी: भाऊ-बंदकीचा वाद जीवावर उठला; वृद्धावर हल्ला करून तिघांविरुद्ध बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हे
जुनी मालमत्ता आणि दुकान हक्काच्या वादातून ७५ वर्षीय वृद्धावर स्वतःच्या भावाकडून व पुतण्याकडून जीवघेणा हल्ला झाल्याची घटना कुसळंब (ता. बार्शी) येथे घडली. या प्रकरणात पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत विलास दिलीप टिंगरे (वय २८, रा. कुसळंब) यांनी फिर्यात दिली आहे. याप्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात नारायण ज्ञानदेव टिंगरे, बालाजी नारायण टिंगरे आणि पवन नारायण टिंगरे (सर्व रा. कुसळंब) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.