रावेर तालुक्यातील समस्त बंजारा समाज बांधव रावेर शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी एकत्र आले होते. व त्यांनी तेथून तहसील कार्यालयापर्यंत मूक मोर्चा. तहसील कार्यालय आर.के. पवार यांच्यासह समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस.टी.प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी समस्त बंजारा समाजाच्या वतीने करण्यात आली.