कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांना घेऊन जिल्हा परिषद भंडारा समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान भेट देत पाठिंबा दिला. कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. त्याच्यासाठी पुढाकार घेऊन न्याय देण्याची भूमिका घेणार, शासन दरबारी मागण्या मांडणार असल्याचेही यावेळी पडोळे यांनी सांगितले.