भारताला वर्ल्डकप मिळवून देणारे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व दिग्गज जलदगती गोलंदाज कपिलदेव निखंज यांची रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विमान प्रवासादरम्यान खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले आणि श्री. छ. दमयंतीराजे भोसले यांची भेट झाली. या भेटीत क्रिकेट, इतिहास आणि महाराष्ट्रातील क्रिकेटविकास या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. चर्चेदरम्यान १९८३ साली झिम्बाब्वेविरुद्ध कपिलदेव यांनी खेळलेली अविस्मरणीय नाबाद १७५ धावांची खेळी आठवून खासदार भोसले यांनी त्याचा विशेष उल्लेख केला.