मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथे ७ ऑगस्ट रोजी रवींद्र गाडबैल यांच्या बिछायत केंद्राच्या गोडाऊनला अचानक आग लागली. आगीत गाद्या, कपडे, खुर्च्या, टेबल, चटया, मंडप साहित्य तसेच लाकडी वस्तू पूर्णतः जळून खाक झाल्या. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन वाहन घटनास्थळी वेळेत पोहोचू शकले नाही, त्यामुळे आगीने अधिक रौद्ररूप धारण केले. तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केलाय