श्री समर्थ सद्गुरु खंडोजी महाराज यांचा 197 वा श्रीहरी नाम सप्ताह नुकताच संपन्न झाला असून यामधे विविध कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर या महोत्सवाची नुकतीच सांगता झाली आहे.दरम्यान संपूर्ण नाम सप्ताह महोत्सवांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून सेवा देणाऱ्या सेवेकऱ्यांचा तसेच नाम परंपरागत पायदळी सोंगे व सजीव चित्ररथ काढणाऱ्या सॉंग आणि वहन मंडळांचा श्री विठ्ठल मंदिर संस्थांच्या वतीने प्रसाद, श्रीफळ,स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.