कल्याणच्या कोळशेवाडी परिसरामध्ये एक घटना घडली आहे एक परप्रांतीय दुकानदार तरुणीला अश्लील मेसेज करत होता. त्यामुळे संतापलेल्या तरुणीने कुटुंबीयांना ही बाब सांगितल्याने कुटुंबीय आणि तरुणीने दुकानात धाव घेतली आणि संबंधित परप्रांतीय दुकानदाराला तरुणीने चांगलाच चोप दिला. तसेच तिच्या कुटुंबीयांनी त्या तरुणीचे दुकानदाराला पाय धरून माफी मागायला लावली. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेरात चित्रित झाला असून हा व्हिडिओ रात्रीपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.