कापणगाव येथे आज झालेल्या भीषण अपघातात हायवा ट्रकने आटोला दिलेल्या धडकेत 6 निष्पाप नागरिकांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. सदर दुर्घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार सुभाष धोटे यांनी आज दि 28 आगस्ट ला 5 वाजता उपजिल्हा रुग्णालय, राजुरा येथे धाव घेऊन मृतकांच्या कुटुंबीयांना धीर दिला .