औसा - औसा तालुक्यातील शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने हरितक्रांती च्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.ऐकीकडे आमदार अभिमन्यू पवार यांनी जलसमृद्ध औसा अभियान हाती घेत संपूर्ण मतदारसंघ पाणीदार करण्याचा संकल्प केला असताना दुसरीकडे त्यांच्या प्रयत्नांतून बेलकुंड उपसा जलसिंचन योजनेसाठी मोठे यश मिळाले आहे. या योजनेसाठी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १९० कोटीच्या निधीला मंजुरी दिली आहे.