यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहाच्या मागील गोदामात महाराष्ट्र शासनाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम व्यवसायिक मजूर कुटुंबीयांना भांडे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शहर व तालुक्यातील ५०० यांना भांडे वाटप केले जाणार होते मात्र वेबसाईट चालत नसल्यामुळे दुपार पर्यंत केवळ १५ कुटुंबियांनाच भांडे वाटप झाले त्यामुळे आलेल्या कुटुंबियांना पुरता मनस्ताप सहन करावा लागला व या ठिकाणी येथील भोंगळ कारभाराबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला.