सेनगांव तालुक्यातील आजेगांव या ठिकाणी पारंपारिक पद्धती नुसार शेतकऱ्यांचा महत्त्वपूर्ण असलेला पोळा सण आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता शांततेमध्ये साजरा करण्यात आला. आजेगांव येथील आठवडी बाजार परीसरामध्ये गावातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा राजाला सजवुन एकत्रित जमवुन पूजाअर्चा झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी आपले बैल आपापल्या घराकडे नेले त्यानंतर घरोघरी बैलांची पूजा करण्यात आली.यावेळी गोरेगांव पोलिसांच्या वतीने बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.