महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा मिळावा, या मागणीसाठी वाशीम जिल्ह्यातील महसूल सेवकांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, महसूल सेवक हे महसूल यंत्रणेतील कणा असून प्रमाणपत्रे देणे, निवडणुका, जनगणना, आपत्ती व्यवस्थापन तसेच शासकीय योजना राबविणे आदी महत्वाच्या जबाबदाऱ्या ते पार पाडतात. तरीदेखील शासनाने अद्यापपर्यंत त्यांना वर्गीकृत कर्मचाऱ्यांचा चतुर्थ श्रेणी दर्जा व शासकीय सुविधा दिलेल्या नाहीत. त्यामुळे अन्याय होत असल्याचा आ