जिल्ह्यातील पाटण पोलीसांनी गडचांदूर ते पाटण मार्गे तेलगंना येथे कत्तलीसाठी वाहना मधुन अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक होत असल्याबाबत मिळालेल्या गोपनिय माहितीवरून सदर मार्गावर आज दि २२ आगस्ट ११ वाजता सापळा रचुन नाकाबंदी केली असता एक पिकअप वाहन येत असतांना दिसल्याने त्यास यांबवून पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये एकुण ०५ गोवंशीय जनावरे दोरीने बांधुन कत्तीकरीता घेऊन जात असतांना पोलिसांनी पकडले.