कोल्हापुरात उद्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं विसर्जन पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे. कोल्हापूर जिल्हा पोलीस दल आणि महापालिका प्रशासन यांनी मुख्य मिरवणूक मार्ग असणाऱ्या मिरजकर तिकटी,महाद्वार रोड, पापाची तिकटी..गंगावेश या परिसरात टॉवर उभारले असून सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवायला सुरुवात केली आहे.