लातूर -मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी बांधवांच्या भोजनाची कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी लातूर तालुक्यातील जवळा बुद्रुक गावातील मराठा समाज बांधव पुढे सरसावले आहेत.गावकऱ्यांनी एकत्रितपणे या समाजकार्याची जबाबदारी उचलत, तब्बल ५ हजार ज्वारी व बाजरीच्या भाकऱ्या, ५ हजार चपात्या तसेच पाच ह. लोकांना पुरेल इतका चिवडा तयार केला करून आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता गावातून हलगी लावून वाजत गाजत जेवणाने भरलेला सदर टेम्पो मुंबईकडे रवाना करण्यात आला.