वाहिरा येथील झालेल्या खून प्रकरणात आरोपींच्या अटकेसाठी तीन पथके रवाना करण्यात आले आहेत. अशी माहिती अंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साळवे यांनी माध्यमांसमोर बोलताना दिली आहे. वाहिरा येथे दोन सख्या भावांचा खून केल्याची घटना घडली होती. यामध्ये काही संशयीत लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.तर जे पाहिजेत असे आरोपींना पकडण्यासाठी तीन पथके पाठवण्यात आलेले आहेत. अशी माहिती पोलीस निरीक्षक साळवे यांनी दिली.