पारोळा तालुक्यातील लोणी खु येथे भव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाचे नुकतेच उत्साहात आ. अमोल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. शेकडो शिवप्रेमींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. लोणी खु गावात ग्रामस्थांनी उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला ग्रामस्थांनी बोलावले, महाराजांच्या चरणाशी नतमस्तक होण्याची संधी दिली, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे अमोल पाटील यांनी सांगून ग्रामस्थांचे आभार यावेळी मानले.