दि. 24 ऑगस्ट रोजी दुपारी 4 च्या सुमारास भाग्यनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत दोन इसम हे संशयीतरित्या मोबाईल विक्री करण्यासाठी थांबले असल्याची माहिती मिळाल्याने जय भवानी चौक नवीन वाडी येथे जाऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी भाग्यनगर लिंबगाव व बारड येथे पहाटेच्या वेळी भाजीपाला विक्रेते व दूध विक्रेते यांना खंजर चा धाक दाखवून लुटल्याचे सांगितले होते, अशी माहिती आजरोजी संध्याकाळी 6 च्या सुमारास प्रेसनोटद्वारे देण्यात आली आहे.