याबाबत अधिक माहिती अशी की स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना पथकास माहिती मिळाली की संशयीत आरोपी विशाल काळे पारधी पिढी भुम याच्याकडे चोरीचा माल असुन तो विक्री साठी घेवुन जाणार आहे. दरम्यान पोलिसांनी तपासणी केली असता वाहनात ॲल्युमिनीयम तारेचे बंडल दिसुन आले व त्याची चौकशी केली असता या तारा कळंब वाशी सरमकुंडी भागातुन पवनचक्की खांबावरील चोरी केल्याची कबुली दिली.त्या तारा चोरी प्रकरणी सहा गुन्हे दाखल आहेत.