दोन दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका महिला अधिकाऱ्याला खडसावल्याच्या व्हिडिओ आणि बातम्या पसरत आहेत. मात्र अजित पवार फक्त त्या महिलेला शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेईपर्यंत कारवाई थांबवावी असे सूचना देत होते. मात्र काही प्रसार माध्यमे अत्यंत खोडसाळपणे अजित पवारांबद्दल चुकीच्या बातम्या लागत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिली आहे.