रायगड जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणपती बाप्पांच्या विसर्जन सोहळ्याची उत्साहात सांगता झाली आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये घरगुती तसेच सार्वजनिक मिळून एकूण २५ हजार ५५१ बाप्पांचे विसर्जन पारंपरिक उत्साहात आणि भक्तिभावाने करण्यात आले. विसर्जनासाठी समुद्रकिनारे, नद्या, ओढे तसेच कृत्रिम तलावांवर मोठी गर्दी झाली होती.