काहि दिवसांपुर्वी अटलसेतुवरून जाणा-या इलेक्ट्रीक वाहनांना (EV) अध्यादेश असुनही टोलमक्त प्रवास करू दिला जात नव्हता. यासंबंधात अटलसेतुच्या संबंधित अधिका-यांसोबत मनसे प्रवक्ते योगेश चिल्ले व मनसे पदाधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर EV गाड्यांना टोलमुक्तीची प्रक्रीया सुरू करण्यात आली होती...त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करकरून अटल सेतूवरून जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोल फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे.