पातूर तालुक्यातील भंडारज बु. गावातील जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजनेतील ५० लाखांहून अधिक रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. या गैरव्यवहारामुळे गावकऱ्यांना अद्याप पिण्याचे पाणी मिळालेले नाही. त्यामुळे संतप्त महिला आणि ग्रामस्थांनी अकोल्याच्या जिल्हा परिषद कार्यालयावर हंडा मोर्चा काढत संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करून त्वरित पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली. जिल्हा परिषदेच्या सीईओ सुनीता मेश्राम यांनी शाखा अभियंत्यांकडून भ्रष्टाचार झाल्याची कबुली देत चौकशीचे आदेश दिले.