बोदवड तालुक्यात पळासखेडा बुद्रुक हे गाव आहे. या गावाच्या शेत शिवारात खदानी जवळून नारायण किशोर पवार वय २२ हा तरुण जात होता. दरम्यान त्याचा पाय घसरला आणि तो खदानीच्या पाण्यात बुडाला. तातडीने त्याला तेथून काढून बोदवड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. तेव्हा या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.