फिर्यादी नरेशकुमार नरनोलिया यांनी नाशिक येथून विदेशी दारूचा साठा ट्रक क्र. एम.एच.15 जी व्ही 1735 यामध्ये भरून नांदेड वाजेगाव याठिकाणी पोहोचविण्यासाठी ट्रक चालक प्रभाकर विश्वनाथ घुगे यांच्याकडे सुपूर्द केला होता. 1 कोटी 39 लाख 23 हजार रुपयांच्या विदेशी दारू साठ्यापैकी 88 लाख 17 हजार 820 रुपयांच्या विदेशी दारू साठ्याचा अपहार करत फसवणूक केल्याची फिर्याद नरेशकुमार नरनोलिया यांनी दिल्याने प्रभाकर घुगे यांच्या विरोधात जिंतूर पोलीसात सोमवार 8 सप्टेंबर रोजी रात्री 11 34 वाजता गुन्हा दाखल.