मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी दिनांक 29 ऑगस्ट रोजी पासुन आमरण ऊपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस पार पडला आहे. या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत अनेक समाज बांधव मुंबई येथे दाखल झाले आहेत. त्यांच्या जेवणासाठी आज सकल मराठा समाज तालुका उमरी जि.नांदेड येथून भाकरी, पुरी, लोणचं, घेऊन दुपारी चार वाजताच्या दरम्यान समाज बांधव मुदखेड रेल्वे स्टेशन येथुन नंदीग्राम एक्स्प्रेसने जातानाचा व्हिडीओ सादर केला